Fri. Feb 21st, 2020

‘आपण आहे तिथेच रहा’, भुजबळांसाठी मुंबईत सर्वत्र शिवसैनिकांचे बॅनर

भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांनी विरोध दर्शवला आहे. शिवसेना भवन समोर ,मातोश्री समोर तसेच मुंबईच्या सर्वच प्रमुख चौकात भुजबळांच्या विरोधाचे बॅनर लावले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांनी विरोध दर्शवला आहे. विक्रोळी येथील शिवसैनिक रवींद्र तिवारी यांनी शिवसेना भवन समोर ,मातोश्री समोर तसेच मुंबईच्या सर्वच प्रमुख चौकात भुजबळांच्या विरोधाचे बॅनर लावले आहेत.

भुजबळांच्या विरोधातील बॅनरवर हा मजकूर

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांनी बॅनर लावत विरोध दर्शवला आहे.

केसात गजरा आणि गावभर नजरा या तमाशात वग नाट्य व्हायचे त्यातले प्रमुख पात्र लखोबा लोखंडे यांच्याशी मिळते जुळते वाटते!

उगवला दिवस की मी परत येतो, साहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्रातील जनता विसरु शकत नाही.

आपण आहे तिथेच रहा असा मजकूर लिहून रविंद्र तिवारी या शिवसैनिकाने छगन भुजबळ यांचा निषेध नोंदवला आहे.

25 जुलै रोजी राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

यानंतर आणखीही काही नेते शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती. यात भुजबळांचही नाव होत.

मात्र मी शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत भुजबळांनी याचा खुलासा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *