Tue. Apr 7th, 2020

मेट्रो कारशेडवरून शिवसेना भाजप वाद चिघळणार!

मेट्रो कारशेड वरून शिवसेना भाजप वाद चिघळणार आहे. बहुचर्चित मेट्रो करशेडचा प्रस्ताव आज वृक्ष प्राधिकरण समितीत मंजूर झाला. शिवसेनेने विरोध केल्यानंतरही हा प्रस्ताव आज बहुमताने मंजूर झाला.

गोरेगांव आरे येथील मेट्रोच्या कारशेडसाठी 2238 झाडे तोडण्याचा प्रस्ताव गेले दोन वर्ष वृक्ष प्राधिकरण समितीत रखडला होता.

पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने झाडे तोडायला विरोध केला होता मात्र विरोध फेटाळून आज हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

8 विरुद्ध 6 मतांनी मंजूर झाला असून झाडे तोडू नये म्हणून शिवसेनेच्या 6 सदस्यांनी विरोध केला होता.

झाडं तोडण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याने पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

तसंच कोर्टाच्या आदेशाने जे तज्ज्ञ नेमले आहेत, त्यांनी झाडं तोडण्याच्या बाजूने मतदान केल्याने असे तज्ज्ञ हवेच कशाला, असा प्रश्न स्थायी समिती व वृक्ष प्राधिकरण सदस्य अध्यक्ष यशवंत जाधव उपस्थित केला आहे.

विकास आराखड्यात मेट्रो कारशेडसाठी आरक्षित करण्यात आली आहे.

या आरेच्या परिसरात आदिवासी पाडे आहेत.

त्यामुळे याचा करशेड बनल्या नंतर आदिवसी पाडे कुठे जाणार हा सेनेचा प्रश्न होता.

दरम्यान या जागेवर कारशेडसाठी जी जागा निश्चित केली आहे.

त्यापासून हे आदिवासी पाडे दूर असून आरे परिसरातील जे बाधित होणार आहे त्या ठिकाणच्या बाधितांना MMRCL कंपनीने 300 पर्यायी घरे दिली आहेत.

तज्ज्ञांनी झाडं तोडण्याच्या बाजूने अभिप्राय दिला आहे.

मेट्रो झाल्यावर प्रदूषणाचे प्रमाण कमी होणार असल्याने आम्ही झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली अस म्हणत भाजपने सेनेचा विरोध संपवला.

एकवेळी काँग्रेसनेही आरे मधील वृक्ष तोडीला विरोध केला होता. पण आज मात्र काँग्रेसच्या सदस्यांना बोलू न दिल्याने बाहेर ते आले.

महत्वाचं म्हणचे काँगेसला या प्रस्तावाला पाठिंबा द्यायचा होता म्हणून सदस्य बाहेर आले असं सेनेने म्हटलंय.  याला काँग्रेसने प्रत्य़ुत्तर दिलंय. तर शिवसेनेला मुंबईची झाडे वाचवता आली नाही अशी टीका काँग्रेसने केलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *