Sun. May 16th, 2021

काँग्रेस नष्ट करा असं मी बोललोच नाही – उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोमाने सुरू झाला आहे.सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.शिवसेना सत्तेसाठी कधीच लाचार झाली नाही. शिवसेना-भाजपची युती ही हिंदुत्वाची, देशाची गरज होती आणि काँग्रेसमुक्त देश असं मी कधीच म्हणतं नाही असं मत त्यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.सत्तेत असताना उद्धव यांनी स्वबळाचा नारा दिला तसेच अनेक मुद्यांवरून भाजपावर जोरदार टीका केली.मात्र निवडणुका लढत असताना भाजपासोबत युती केली आहे.याच्या पार्श्वभूमीवरचं या मुलाखतीत त्यांनी भूमीका मांडली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसेना कधीच सत्तेसाठी लाचार झाली नाही.

शिवसेना-भाजपची युती ही हिंदुत्वाची, देशाची गरज होती

देश पुन्हा काँग्रेस व भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात घालायचा काय? असा सवाल त्यांनी केला.

‘काँग्रेसमुक्त भारत’ किंवा काँग्रेस नष्ट करा अशी माझी भूमीका नाही.

ठाकरे कधी खोटं बोलत नाहीत. ठाकरे जुमलेबाजी करत नाहीत.

लोकसभा निवडणुकीनंतर राममंदिराच्या उभारणीला गती मिळाली नाही तर मी पुन्हा अयोध्येत जाईन.

मी सामान्य माणूस आहे, कॉमन मॅन आहे आणि मी शिवसैनिक आहे त्यामुळे चौकीदार व्हायची गरज नाही.

पंतप्रधानपदी आता तरी मोदींऐवजी दुसरं कोणी बसवावं असं मला तरी वाटत नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *