Mon. May 10th, 2021

सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेसची छुपी युती

जय महाराष्ट्र न्यूज, मालेगाव

 

एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण शिवसेनेवर टीका करतात की शिवसेनेला स्पष्ट भूमिका घेता येत नाही. पण हीच काँग्रेस मालेगावमध्ये मात्र शिवसेनेला घेऊन

सत्ता काबीज करण्याच्या मार्गावर आहे.

 

मालेगावमध्ये शिवसेना आणि काँग्रेसनं सत्ता स्थापनेसाठी छुपी युती जाहीर केल्याचं उघड झाले आहे.

 

महापौर पदासाठी काँग्रेसनं रशिद शेख यांना उमेदवारी दिली. पण, त्यांच्या अर्जावर शिवसेना गटनेता तसंच नगरसेवकांनी अनुमोदनाच्या सह्या केल्या आहेत.

 

उपमहापौरपदासाठी शिवसेनेनं सखाराम घोडकेंना उमेदवारी दिली. त्यावर काँग्रेसच्या नगरसेवकांनी अनुमोदन दिले.

 

सत्तास्थापनेसाठी 42 हा जादूई आकडा आहे.. त्यासाठी फक्त एका नगरसेवकाची आवश्यकता आहे. एमआयएमने मदत केली किंवा तटस्थ राहिले तर सेना आणि

काँग्रेसच्या युतीनं सत्ता येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *