Fri. Sep 30th, 2022

दसरा मेळाव्यासाठी शिवसेना न्यायालयात

दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अद्याप परवानगी न दिल्याने शिवसेनेच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेकडून थोड्याचवेळात दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या ५ ऑक्टोबरला दसरा मेळावा असल्याने शिवसेनेच्या हातात अगदी थोडाचवेळ शिल्लक आहे. त्यामुळे याचिका अर्जाची प्राथमिक माहिती देऊन सुनावणीसाठी तातडीची तारीख देण्याची विनंती शिवसेनेतर्फे कोर्टाला केली जाऊ शकते.

१९६६ पासून एक मैदान एक दिवस आणि एक घराणे असे या मेळाव्याचे स्वरुप राहिले असून शिवाजीपार्कवर मेळाव्याला परवानगी देताना ती मूळ शिवसेनेलाच दिली गेली होती.आमचाच अर्ज पहिला असून सालाबादाप्रमाणे महापालिकेने परवानगी द्यावी असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. खरा पक्ष कोणाचा या संबंधीची याचिका प्रलंबित असली तरी मूळ घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेनेलाच मेळाव्याचा हक्क आहे असे प्रतिपादन केले जाईल.ठाकरे घराण्याप्रती असलेली सहानुभूती या निमित्ताने सक्रीय व्हावी हा याचिकेचा हेतू असल्याचे सांगितले जाते आहे.

4 thoughts on “दसरा मेळाव्यासाठी शिवसेना न्यायालयात

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.