Sat. May 25th, 2019

शिवसेना ही काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये – शिवसेना

158Shares

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि राजकीय नेत्यांचे पक्षांतर सुरू झाले.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. बुधवारी सुजय विखे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली. यावर शिवसेना ही काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये, असे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे.

शिवसेनेच्या अग्रलेखातून भाजपात सुरु असलेल्या इनकमिंगवर हे भाष्य करण्यात आले आहे. सुजयनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपाच्या दारात रांगा लावून उभे आहेत.याचे मुख्यमंत्र्यांना कौतुक असल्याचे ही अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या घराण्यांविरोधाच आपला संघर्ष होता.  अशी आठवण शिवसेनेने भाजपाला करुन दिली आहे.

काँग्रेसची घराणी वारा येईल तशी पाठ फिरवणारी आहेत. भाजपा किंवा शिवसेना ही काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये.

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नाराजांना घेऊनच हिंदुत्ववादी पक्षांना पुढे जायचे असेल तर ज्यांनी वर्षानुवर्षे विचारांचा भगवा हाती घेणाऱ्यांच काय?असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

विखे-पाटील घराण्याप्रमाणे मोठी राजकीय घराणी भाजपच्या गळाला लागतील. पण भाजप हा काँग्रेस विचारधारेच्या पायावर उभा राहिलेला एक मोठा पक्ष ठरेल.

काँग्रेस- राष्ट्रवादीतील इनकमिंग आज लाभदायक वाटले असले तरी नंतर ते त्रासदायक ठरु शकतात

एखादा पक्ष  सत्तेत असताना लोक येतात आणि सत्ता जाताच दुसरा घरोबा शोधतात.

राधाकृष्ण विखे-पाटील या पितापुत्रांना एकाच वेळी केंद्रात आणि महाराष्ट्रात मंत्रीपदे फक्त शिवसेनेनेच दिली होती, पण युतीची सत्ता जाताच त्यांनी पलटी मारली.

शिवसेनेने सामनातील अग्रलेखातून भाजपला सल्ला दिला आहे. तर सुजय विखे-पाटील यांच स्वागत देखील करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *