Sun. Oct 24th, 2021

शिवसेनेच्या बाबतीत बोलणारे विरोधी पक्ष फालतू आहेत- चंद्रकांत खैरे

विरोधी पक्ष नेत्यांना फालतू म्हणतांना खैरेची जीभ घसरली तर ‘साले’ म्हणत त्याची पुनरावृत्ती केली. माजलगाव शहरात पिक विमा मदत रथ लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते..

“शिवसेनेच्या बाबतीत बोलणारे विरोधी पक्ष फालतू आहेत. शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी काय केले यांना माहीत आहे का ? चटकेबसेपर्यंत आम्ही आंदोलन केलं. कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला प्रत्यक्ष मदत, शेतकऱ्याच्या अकराशे मुलींचं कन्यादान केलं. तेव्हा हे विरोधी पक्षाला दिसत नाही का ? कुठे गेले हे  ‘साले’ विरोधी पक्ष? काय फ़क्त राजकारणच करतात. पुन्हा इकडून लफडे कर तिकडून लफडे कर…”अशी सडकून टीका शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. यावेळी विरोधी पक्ष नेत्यांना फालतू म्हणतांना खैरेची जीभ घसरली तर ‘साले’ म्हणत त्याची पुनरावृत्ती केली. माजलगाव शहरात पिक विमा मदत रथ लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते..

“शिवसेनेच्या बाबतीत कुणीही बोलू शकत नाही!”

बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खैरेंनी पिकविम्यासंदर्भात विविध बँकाना भेट दिली.

त्यावेळी बँक कर्मचारी अधिकारी यांना चांगलंच सुनावलं.

तसंच टीका करणाऱ्या विरोधी पक्षावर खैरे चांगलेच संतापले. विरोधी पक्ष फालतू आहेत, असं म्हणत ‘या साल्याना शिवसेनेने केलेली मदत दिसत नाही का ?’ असा सवाल उपस्थित केला.

विरोधी पक्ष फ़क्त टिका करतात.

शिवसेनेच्या बाबतीत कोणीही बोलू शकत नाही. आता फक्त शिवसेनाच शेतकऱ्यांच्या बाजूने काम करते, बाकी कोणी करत नाही. बाकीचे फक्त टीका टिप्पणीच करतात असा टोला खैरे यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *