Tue. Jan 18th, 2022

दाऊदला मी अनेकवेळा पाहिलंय, बोललोय आणि दमही भरला – संजय राऊत

कुख्यात गॅंगस्टर दाऊद इब्राहीमला मी अनेकवेळा पाहिलय. त्याच्याशी बोललोय आणि दमही भरल्याचं खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

पुण्यामध्ये आज लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

या कार्यक्रमात राऊतांनी अनेक मुद्द्यांना हात घालत, अनेक प्रश्नांची उत्तर ही दिली.

या कार्यक्रमाच्या माध्यामातून त्यांनी आपल्या पत्रकारितेतील आठवणींना उजाळा दिला.

माणसात हिमंत असली की समोर गृहमंत्री, पतंप्रधान असो, तुमच्याकडे कोणीही पाहू शकत नाही, असेही राऊत म्हणाले.

भाजपवर निशाणा

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्याचा आम्हाला अभिमानच होता. परंतु पुढं सगळं बदलत गेलं. त्यानंतर चक्र फिरल्याचे संजय राऊत म्हणाले.

माझं ते माझं. तुझं ते माझ्या बापाचे, असा राजकारणातला स्वभाव आहे, अशा शब्दात राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *