सेनेचे मनसेला प्रत्युत्तर?

शिवसेनेकडून हनुमान जयंतीनिमित्त दादर परिसरातील हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम पार पडणार आहेत. या दोन्ही पक्षांचे कार्यक्रम एकत्र आल्यामुळे ‘सेनेने मनसेला प्रत्युत्तर?’ देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेने आणि शिवसेना हे दोन्ही एकमेकांना शह देण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करत नाहीत ना, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वाराणसीतही हनुमान चालीसा
अजानच्यावेळी हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर लावण्याचे लोण आता उत्तर प्रदेशमध्येही पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अजानच्या विरोधात आता लाऊडस्पीकर हनुमान चालीसा लावणार असल्याची धमकी दिली आहे. मशिदींमध्ये अजानसाठी जोपर्यंत लाऊडस्पीकर वापरला जात आहे तोपर्यंत लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावून विरोध दर्शविला जाणार आहे.