शिवसेना महानगरप्रमुख सतीश महालेंचा राजीनामा

शिवसेनेतील बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड पुकारला आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलेले आहे. एकनाथ शिंदे हे देंवेंद्र फडणवीसांना भेटले आहेत अशी अफवा पसरवण्यात येत होती. परंतु भाजप नेते सुधिर मुनगंटीवार यांनी अशा अफवांना पूर्णविराम दिला आहे.
महाराष्ट्रात शिवसैनिक शिंदे समर्थकांच्या कार्यालयाची तोडफोड करताना दिसत आहेत. ससेच सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी शिंदे समर्थकांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली होती. त्याशिवाय धर्मवीर आनंद दिघेंच्या शिकवणीमुळे आम्ही शांत असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. तसेच धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत असेही ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेचे धुळे महानगरप्रमुख सतीश महाले यांनीसुद्धा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी संकटकाळात मदत केल्याने त्यांच्यासोबत जात आहे, असे सतीश महाले म्हणाले आहेत. तसेच गेल्या तीन दिवसांपासून धुळे शहरात सतीश महालेविरुद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळत आहे.
राज्यपाल आता कोरोनमुक्त झाल्यामुळे या सर्व राजकीय घडामोडींना वेग येईल.