Tue. Oct 26th, 2021

नावात ‘ठाकरे’ आहे, म्हणून राज ठाकरेंना थोडी किंमत आहे- गुलाबराव पाटील

“राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा नावात ठाकरे आहे म्हणून थोड़ी फार किंमत आहे. नाहीतर कुठे तरी पडले असते” असं म्हणत बाळासाहेबांशी (Balasaheb Thackeray) गद्दारी करणारे संपलेत अशी टीका शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केली.

नाशिक (Nashik) महापालिकेच्या प्रभाग क्र. 26 च्या पोटनिवडणुकीत उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकरराव जाधव यांच्या प्रचारार्थ कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील आले होते. यावेळी बोलताना पाटील यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली.

या पोटनिवडणुकीत मनसे, भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी यांच्यात तिरंगी लढत होते आहे. दरम्यान, या सभेत पाटील यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा देखील चांगलाच समाचार घेतला.

‘भाजपने नोटबंदी करून फसवणूक केली आणि आता म्हणता हे सरकार चालणार नाही म्हणजे तुम्ही कोणाशीही युती केलेली चालते आणि आम्ही केलेली का नाही चालत?’ असं सवाल त्यांनी उपस्थित करत टीका केली.

भाजप फक्त निवडणुकीत पैशाचा वापर करते त्यांच्याकडे दुसर काही नाहीये अस आरोप देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *