Tue. Dec 7th, 2021

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद: औरंगाबादमधील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आता आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बजाजनगर येथे जलवाहिनीचे भूमिपूजन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात संचारबंदी लागू असताना आमदार संजय शिरसाट यांच्याकडून संचारबंदीचे उल्लंघन झाले. त्यामुळे संजय शिरसाट यांच्यासह ३० ते ४५ कार्यकर्त्यांवर वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामुळे संचारबंदीच्या काळात मोठ्या संख्येने उपस्थित राहून केलेले भूमिपूजन महागात पडणार आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *