Tue. Aug 9th, 2022

नाशकात शिवसेनेचा मोर्चा

सध्या राज्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकविरुद्ध एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्यभरात शिवसौनिक शिंदे समर्थकांच्या कार्यालयाची तोडफोड करत आहेत. त्यामुळे खरे शिवसैनिक असाल तर समोर या, असे थेट आवाहनही श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.  दोन्ही गट एकमेंकावर वार – प्रतीवर करत आहेत. ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक यांमध्ये जोरदार संघर्ष चालू आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेवेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांचा गटात सामील झालेल्या आमदारांच्या निषेधार्त मोर्चा हा मोर्चा काढण्यात आला आहे. तसेच शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी शिवसैनिक राज्यभरात एकजुटले आहेत.

शालिमार येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयापासून शहरात शिवसैनिकांचा भव्य मोर्चा काढला आहे. त्याशिवाय ठीक – ठिकाणी शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.