Fri. Jan 22nd, 2021

लोकसंख्या नियंत्रणासाठी शिवसेनेचा राज्यसभेत ‘असा’ प्रस्ताव

लोकसंख्यावाढ नियंत्रणाचा विचार करून शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी आज सुधारणा विधेयक संसदेत मांडलं. भारतीय राज्यघटनेतील कलम 47 अ मध्ये बदल करण्यासाठी सुधारणा विधेयकाचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. यामध्ये हम दो हमारे 2 चाच नारा पुन्हा देण्यात आलाय.

काय आहे अनिल देसाईंचा प्रस्ताव?

लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी लहान कुटुंबांना प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं देसाई यांनी म्हणत त्यासाठी आपत्यसंख्या 2 असणाऱ्य़ा कुटुंबांना शिक्षण, कर आणि रोजगारात सवलती देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. तसंच जी कुटुंबं या नियमांचं पालन करणार नाही, त्यांना या सवलतींपासून वंचित ठेवण्यात यावं, असंही विधेयकात म्हटलं आहे.

लोकसंख्येचा विस्फोट हा चिंतेचा विषय असून त्यामुळे हवा, पाणी, जंगलं आणि नैसर्गिक संसाधनांचं शोषण होतं. त्यामुळे आपण लोकसंख्या नियंत्रणासाठी लोकांना प्रोत्साहित करायला हवं. सामाजिक लाभांच्या योजनांत त्यासाठी अशा छोट्या कुटुंबाना विशेष सवलत द्यायला हवी, असं विधेयकात म्हटलं आहे.

लोकांना 2 पेक्षा अधिक मुलं असल्यास त्यांच्या करातील सवलती काढून घेणं, त्यांच्यावर आणखी कर लादणं तसंच दंडात्मक कारवाईच्या योजना करण्याचाही सल्ला देसाई यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *