मुसलमानांनी शिकावं आणि पुढं जावं हे बाळासाहेब ठाकरेंचं मत होतं – संजय राऊत

महाविकास आघाडी सरकारने मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राजकारण चांगलच तापलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
लांगूनचालन कशाला म्हणतात, हे आम्हाला कोणाकडून शिकण्याच गरज नाही. एवढ्या वर्षे मुस्लीमांचं लांगुन चालन कोण करत होतं, हे आम्ही पाहिलंय.
चंद्रकांत पाटील आणि इतराचं आम्ही वैफल्य समजू शकतो.
देशातील अधिकृत असलेल्या नागरिकांना मुस्लिम, हिंदू ,बौद्ध यांना शिक्षणाच्या बाबतीत काही सवलती मिळत असतील तर तो समाज पुढे जातोच.
अनेक समाज आजही शिक्षण नसल्यामुळे अंधश्रद्धा आणि अज्ञानाच्या दरीत आहेत.
शिवाय मुसलमानांनी शिकावं आणि पुढे जावा असं बाळासाहेब ठाकरेचं देखील मत होतं, असं खासदार संजय राऊत यांनी मुस्लीम आरक्षणासंबंधी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
भाजप प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर आरोप केला. महाविकास आघाडी मुसलमानांचं लांगुन चालन करत आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.
संजय राऊत अंबरनाथमधील शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलला उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
तसेच संजय राऊत यांनी अंबरनाथ शिवमंदिर कला महोत्सवाबद्दलही प्रतिक्रिया दिली.
मी अंबरनाथला खूप वर्षांनतर आलो. मी यावं असा आग्रह खासदार श्रीकांत शिंदे यांचा होता.
या फेस्टिव्हल विषयी ऐकून होतो. एका खासदारानं पुरातन शहरामध्ये कशा प्रकारे सांस्कृतिक कार्य करावं, हे मी पाहिलं.
श्रीकांत शिंदेमुळे अंबरनाथमधील जागेचं दर वाढू शकतात. या अशा फेस्टिवलमुळे शिवमंदिर जगाच्या नकाशावर गेलंय, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
तसेच मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरुन फडणवीस यांनीही विरोध केला आहे.
मुस्लिमांना आरक्षण दिल्यास याचा परिणाम ओबीसी आणि मराठा आरक्षणावर होईल, यामुळे मुस्लिम आरक्षणाला आमचा विरोध असल्याचं विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
तसेच शिवसेनेने सत्ता स्थापनेपूर्वी आघाडीतील मित्र पक्षाबरोबर काय सेटिंग झाली होती? असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.