शिवजयंतीचा वाद मिटवण्यासाठी शिवसेनेची भन्नाट आयडिया

शिवजयंतीचा वाद मिटवण्यासाठी शिवसेनेने भन्नाट आयडिया लढवली आहे. मुख्यमंत्री तारखेप्रमाणे तर शिवसैनिक तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

काय म्हणाले अनिल परब ?

शिवजयंतीची तारीख आणि तिथी याबाबतचा निर्णय घेण्यासाठी शासनाकडे वेळ कमी आहे. सत्तास्थापने नंतरची पहिली शिवजयंती तारखेनुसार होणार.

तर यानंतर याबाबत सर्व एकत्र येऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

शासकीय शिवजयंती (तारखेनुसार) ही फेब्रुवारी महिन्यात साजरी केली जाते.

तर शिवसेनेकडून साजरी करण्यात येणारी मार्चमधील शिवजयंती ही (तिथी) नुसार साजली केली जाते.

अवघ्या काही दिवसांवर शिवाजी महाराजांची जयंती येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार साजरी करण्यासाठी मागणी जोर धरत आहे.

मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्यात यावी, असे आवाहन ट्विटद्वारे मुख्यमंत्र्यांना केलं होत.

तसेच भाजप आमदार नितेश राणे यांनीही याबाबतीत ट्विट केलं होतं.

Exit mobile version