मणिशंकर अय्यर छाप पुढाऱ्यांसह काँग्रेस चालवण्यापेक्षा पक्ष बरखास्त केलेला बरा- सामना

सावरकरांना पळपुटे म्हणणारे राहुल उरलेली सहानुभूतीही गमावून बसले.मोदी यांनी हिंदू राष्ट्रवादाने वातावरण भारून टाकले. पुलवामा हल्ला व बालाकोट एअर स्ट्राइकनंतर देश राष्ट्रभक्तीत लीन झाला आणि श्रीमान राहुल गांधी हे स्वातंत्र्यलढय़ाचे महानायक वीर सावरकरांवर अभद्र बोलत राहिले. मणिशंकर अय्यर छाप पुढाऱ्यांना घेऊन काँग्रेस चालवण्यापेक्षा पक्ष बरखास्त केलेला बरा. असं मत सामना मध्ये मांडले आहे.
नेमकं काय म्हटलं आहे सामनामध्ये?
काँगेस पक्षाला यंदा 2014 पेक्षाही दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
सावरकरांना पळपुटे म्हणणारे राहुल उरलेली सहानुभूतीही गमावून बसले.
मणिशंकर अय्यर छाप पुढाऱ्यांना घेऊन काँग्रेस चालवण्यापेक्षा पक्ष बरखास्त केलेला बरा.
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, पण पक्षाने तो स्वीकारला नाही.
तो न स्वीकारणाऱ्यांना चेहरे नाहीत मजबूत हात नाहीत हेच काँग्रेसचे खरे स्वरूप आहे.
लोकसभेत विरोधी पक्षनेता बनवता येईल इतक्या ‘55’ जागाही काँग्रेस मिळवू शकली नाही.
एकतर काँग्रेसवर सतत घराणेशाहीचा आरोप होतो. आता ही घराणेशाहीदेखील काँग्रेसला वाचवू शकत नाही
काँग्रेसने प्रियंका गांधींना आणले, उपयोग काय झाला?
सामनामध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.