Fri. Jan 21st, 2022

सामनाच्या अग्रलेखातून ‘राफेल’प्रकरणी भाजपवर घणाघात

पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी संसदेत राफेलचे समर्थन  केलं.

राफेल प्रकरणी उगाच विरोधकांना दोष का देता ?

‘सत्यमेव जयते’ हाच देश जिवंत ठेवण्याचा मंत्र आहे.

विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील! बाके बडवल्याने सत्य मरेल काय ?

असा सवाल करत आपल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर घणाघात केला आहे.

काय म्हटलयं अग्रलेखात?

 • जाहीर सभेत झोडपाझोडपी करावी अशाच थाटाचे भाषण पंतप्रधान मोदी संसदेत करतात.
 • पंतप्रधानांच्या प्रत्येक वाक्यावर त्यांच्या पक्षाचे लोक बाके बडवीतात. बाके बडवल्याने सत्य मरते का ?
 • राफेल प्रकरणात मोदींचा सहभाग सिद्ध करणारा एक नवा दस्तऐवज बाहेर आला आहे.
 • हे काळे पान समोर आल्याने बाके वाजवून देशभक्तीचे नारे देणार्‍यांची तोंडे त्यामुळे बंद झाली.
 • राफेलवरून राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचे काय?
 • ‘सत्यमेव जयते’ हाच देश जिवंत ठेवण्याचा मंत्र आहे.उगाच विरोधकांना दोष का देता?
 • विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील, असे शिवसेनेने म्हटंले आहे.
 • ‘चौकीदार चोर है’ हा नारा देशाच्या कानाकोपर्‍यांत पोहचण्यास राफेल प्रकरणातली लपवाछपवी कारणीभूत आहे.
 • पाचशे कोटींचे राफेल विमान सोळाशे कोटींना विकत घेण्यामागचा तर्क काय?
 • राजकारणात तळे राखी तो पाणी चाखी हे मान्य, पण येथे समुद्रच गिळला जात आहे.
 • जोपर्यंत या  प्रकरणी समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत नागरिक प्रश्न विचारत राहणार आहेत.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *