Wed. Jun 29th, 2022

शिवसैनिकांची मतं कुणाला ?

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने बाजी मारली आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम रिंगणात होते. दोन्ही पक्षांमध्ये विजयासाठीची चुरस पाहायला मिळाली. या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला. तर, भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव झाला आहे.

मात्र , निकालाच्या आकड्यांकडे बारकाईने बघितले तर , काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांना ९६२२६ इतकी मतं मिळाली. तर, भाजप उमेदवार सत्यजित कदम यांना ७७४२६ इतकी मतं मिळाली. काँग्रेसने १८८०० मतांनी भाजपचा पराभव केला. अशी आकडेवारी दिसत असली तरी, काँग्रेसची मतसंख्या मागील निवडणुकीच्या जवळपास आहे तर उलटपक्षी मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची मतसंख्या वाढलेली दिसत आहे.

कोल्हापूर २०१९ निवडणुकांचे निकाल पाहिल्यास, काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांना ९१०५३ इतकी मते मिळाली होती. म्हणजेच, जयश्री जाधव यांना त्यांच्या पतीपेक्षा फक्त ५१७३ मते जास्त मिळाली आहेत. तर , २०१९ ला शिवसेना-भाजप युतीला ७५८५४ इतकी मते मिळाली होती म्हणजेच, भाजपची मते १५७२ इतकी मते वाढली आहेत. काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी असताना इतकी कमी मते कशी पडली ?

दरम्यान, शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारल्यानंतर, ‘शिवसैनिक काँग्रेसलाच मतदान करणार’ असं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. मात्र, प्रत्यक्षात निवडणुकीचा निकाल पहिला तर तसे दिसत नाहीए.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.