Thu. Mar 21st, 2019

“महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ राहणार!”

532Shares

मातोश्रीवर झालेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ राहील, अशी भूमिका जाहीर करण्यात आली आहे. युतीसंदर्भातील सर्व निर्णय पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.

25 वर्षांपासून आम्हीच मोठे भाऊ!

25 वर्षांपासून महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि आम्हीच राहणार अशी भूमिका बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी मांडली. भाजपकडून अद्याप युतीच्या जागावाटपासंदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

राजकारणात अनेक अदृश्य हात!

राजकारणात अनेक अदृश्य हात असल्याचं संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेब आणि उद्धवसाहेबांचं नेतृत्व निधड्या छातीचं असल्याने कोणत्याही अदृश्य हातांची मदत घेणार नाही.

मातोश्रीवर झालेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात विचार विनिमय करण्यात आला.

भाजपच्या प्रपोजलची आम्ही वाट पाहत नाही असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं, तरी जर सन्मानजनक प्रस्ताव आल्यास विचार करू, असे संकेतही देण्यात आले.

आठवड्याभरात युतीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असं यावेळी सांगण्यात आलं.

अर्थसंकल्पासंदर्भात शिवसेनेची मागणी

१ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पामध्येही काही मागण्या शिवसेनेने केल्या आहेत. 8 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर कर न लावण्याची विनंती आपण करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *