Tue. Jun 18th, 2019

‘ठाकरे’ सिनेमाचे पोस्टर न लावल्याने आयनॉक्समध्ये शिवसैनिकांचा गोंधळ

118Shares

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील बहुचर्चित ‘ठाकरे’ सिनेमा आज म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे.

दरम्यान वाशी येथील आयनॉक्स या मल्टिप्लेक्समध्ये ‘ठाकरे’ सिनेमाचे पोस्टर न लावल्याने शिवसैनिकांनी सिनेमागृहात घोषणाबाजी केली.

तसेच जोपर्यंत सिनेमाचे पोस्टर लावले जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतला होता.

वाशीच्या आयनॉक्समध्ये आज सकाळी सकाळी 8 वाजता ‘ठाकरे’ सिनेमाचा शो होता. हा सिनेमा पाहण्यासाठी सकाळीच नवी मुंबईतील अनेक जेष्ठ शिवसैनिकांनी गर्दी केली होती.

मात्र सिनेमागृहाबाहेर या सिनेमाचे एकही पोस्टर न लावल्याने शो आहे की नाही असा संभ्रम त्यांच्यामध्ये निर्माण होत होता.

आजच्या 8च्या शोसाठी या ठिकाणी ‘उरी’ व अन्य हिंदी सिनेमा लागले असून त्याचे पोस्टर सर्वत्र झळकत आहेत.

मात्र ‘ठाकरे’ सिनेमा सोमवारपर्यंत हाऊसफुल असूनही पोस्टर न लावणे हा तर डिवचण्याचा प्रकार असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.

दरम्यान अर्ध्या तासात हे पोस्टर लावण्यात येतील या आश्वासनानंतर शिवसैनिकांची घोषणाबाजी बंद झाली.

मात्र जोपर्यंत सिनेमाचे पोस्टर लागत नाहीत तोपर्यंत शो सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे.

आयनॉक्स सिनेमागृह वाशीच्या रल्वे स्टेशनसमोरच आहे. दरम्यान चित्रपटगृहाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळीच हा गोंधळाचा प्रकार सुरु असल्याने स्थानकांत जाणाऱ्या प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

118Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *