Tue. Oct 26th, 2021

शिवशाही आणि खासगी बसचा भीषण अपघात

वाई – महाबळेश्वरच्या पसरणी घाटात दोन बसचा भीषण अपघात झाला आहे. शिवशाही- खासगी बसमध्ये हा अपघात झाला आहे. हा अपघात दुपारी साडे बाराच्या दरम्यान अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसमधील 25-30 जणं जखमी झाले.

पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने शिवशाही बस जात होती. तर महाबळेश्वरहून पुण्याच्या दिशेने खासगी ट्रॅव्हल बस येत होती. या दोन्ही बसची पसरणी घाटात जोरदार धडक झाली. या धडकेत खासगी ट्रॅव्हल बस पलटली.

जखमींना बसमधून इतर प्रवाशांनी तातडीने बाहेर काढले. जखमींवर वाई आणि पाचगणी मधील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

अपघाती शिवशाही बसचा क्रमांक MH 06 BW 3675 असा आहे. तर खासगी ट्रॅव्हलचा क्र MH 11 L 5999 असा आहे. दैव बलवत्तर म्हणून खासगी बस पलटून कठड्याला धडकल्याने खाली पडण्यापासून वाचली. खासगी बसमधीलक प्रवाशी पुण्यात विवाहसाठी जात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *