शिवशाही जोमात, खासगी बसेस कोमात?

एसटी महामंडळाची शिवशाहीने बस सेवा ही खासगी प्रवासी वाहतुकीवर भारी पडताना दिसत आहे. पुणे विभागात शिवशाही बस सेवा जोमात सुरु आहे. त्यातच खासगी बसेसच्या तुलनेत शिवशाहीने प्रवाशांना अॅडव्हान्स सुविधा देत आहे. त्यामुळे प्रवाशांचा शिवशाहीकडे ओढा वाढतोय.
जास्त सुविधांमुळे शिवशाहीला प्रवाशांची पसंती!
खासगी प्रवासी बस वाहतुकीला पर्याय म्हणून एसटी महामंडळाने ‘शिवशाही’ सुरू केली.
या शिवशाहीमध्ये खासगी बसेसपेक्षाही जास्त सोयी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, रिव्हर्स कॅमेरे आणि प्रवाशांना टीव्ही बरोबर मोबाईल चार्जिंग पॉईंटची सोय करण्यात आली आहे.
याचबरोबर सुरक्षेबाबतची सर्व खबरदारी आल्याने पुणे विभागात शिवशाहीकडे प्रवासी आकर्षित होत आहेत.
त्यामुळे पुणे विभागात खासगी प्रवासी वाहतूक संपुष्टात येत आहे.
शिवशाहीचे अपघात होतात याबाबत मीडियातून सातत्याने दाखवले जात आले तरी आम्ही सुरक्षेतची सर्व खबरदारी घेत असल्याचं ‘शिवशाही’च्या व्यवस्थापकांनी सांगितलंय. शिवशाहीच्या ताफ्यात आणखीन गाड्या वाढणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.