Sat. Aug 13th, 2022

खुशखबर! आता शिवशाहीचा प्रवास होणार स्वस्त

शिवशाहीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर एसटी महामंडळाने शिवशाही शयनयान (एसी, स्लीपर) सेवेचे तिकीट दर 230 ते 505 रुपयांनी कमी केले आहेत.

नवे तिकीट दर 13 फेब्रुवारीपासून लागू होतील, असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

शिवशाही (स्लीपर) राज्यात 42 मार्गावर धावतात. त्या सर्व मार्गावरील तिकीट दर कमी करण्यात आले आहेत.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, खासगी वाहतुकीशी स्पर्धा त्याचप्रमाणे लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांसाठी सुखकर आणि माफक दरामध्ये व्हावा, या उद्देशाने ही कपात करण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.

एसटी महामंडळाने शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरातील कपातीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविला होता.

खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी दरकपातीचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता.

स्पर्धेसोबत प्रवाशांना कमीत कमी पैशांत सुखकर प्रवास उपलब्ध करून द्यावा, हाही उद्देश दरकपातीमागे होता, असे महामंडळाचे अध्यक्ष रावते यांनी स्पष्ट केलं आहे.

याआधीच ज्येष्ठ नागरिकांना 30 टक्के सवलत होती. नव्या दरपत्रिकेनुसार ज्येष्ठ नागरिकांना शिवशाहीचा प्रवास आणखी स्वस्त होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.