Mon. Jul 22nd, 2019

जैतापुर येथे शॉक लागून 100 हून अधिक मेंढयांचा मृत्यू

0Shares

कन्नड तालुक्यातील जैतापुर येथे शनिवारी पहाटे  विजेची मेन वायर तूटल्याने शॉक लागून 100 हून अधिक मेंढया मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. या मेंढया मेंढपाळच्या असून त्यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. यावरून महावितरणाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

नेमकं काय घडलं ?

जैतापुर शिवरातील ज्ञानेश्वर झाल्टे यांच्या गट नं 296 शेतातील विजेची मेन तार तूटल्याने तिथे उपस्थित असलेल्या सर्व मेंढयांना शॉक लागला आहे.

शनीवारी पहाटे 12 ते 1 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. यामध्ये शॉकमुळे 100हून अधिक मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहे.

नांदगांव तालुक्यातील वाकला येथील मेंढपाळ यांच्या त्या मेंढया होत्या. मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने मेंढपाळाचे लाखो रूपयाचे नुकसान झाल्याचे समजत आहे.

या परीसरातील अनेक विज प्रवाह करणारे खांब वाकलेले आहेत.या खांबावरच्या सर्व तारा लोंबकळत होत्या.

त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी अनेकवेळा महावितरणांकडे केली होती.

मात्र महावितरणाकडून अद्याप कोणतेही करवाई करण्यात आली नाही.महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे  हे घडलं आहे असं सांगण्यात येत आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: