Thu. Sep 29th, 2022

शिवसेना आमदाराचा धक्कादायक आरोप

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघडी सरकारवर मोठं संकट कोसळलं आहे. कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या दोन आमदारांनी शिंदेची साथ सोडत महाराष्ट्रात परतले आहेत. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील आणि बाळापूरचे आमदार नितीन देशमुख पुन्हा महाराष्ट्रात परतले आहेत.

महाराष्ट्र राजकीय नाट्य सुरू असताना अकोला जिह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख शिंदेंच्या बंडात सामील होते. मात्र, आता ते नागपूरला परतले असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात परतल्यानंतर नितीन देशमुख यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. तसेच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक असून सूरतमध्ये माझा घात करण्याचा डाव आखण्यात आला असल्याचे नितीन देशमुख म्हणाले आहेत.

काय म्हणाले नितीन देशमुख?

नागपुरात येताच आमदार नितीन देशमुख म्हणाले, मला हृदयविकाराचा झटका आला नाही. तरीहि मला रुग्णालयात दाखल करून जबरदस्तीने इंजेक्शन टोचण्यात आले, असे नितीन देशमुख म्हणाले. मी घरी येत होतो. मात्र, पोलिसांनी मला रुग्णालयात नेलं. हृदयविकाराचं कारण सांगून मला मारण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे आमचे मंत्री होते पण मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. तसेच माझं उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणं झालं असल्याचेही नितीन देशमुख म्हणाले. मला हृदय विकाराचा झटका आला नव्हता, तरीही मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आले. त्यामुळे पोलिसांचा माझा घात करण्याचा डाव होता, असे नितीन देशमुख म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.