Sun. Jun 20th, 2021

नेदरलँडमधील युट्रेक्ट शहरात गोळीबार, अनेकजण जखमी

गेल्या आठवडयात न्यूझीलंडच्या दोन मशिदींमध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आज नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरातील ट्राममध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.

घटनास्थळी दहशतवादविरोधी पोलीस उपस्थित असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

या गोळीबारात अनेकजण जखमी झाले असून घटनास्थळी मदतकार्य सुरु झाले आहे असे युट्रेक्ट पोलिसांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. मदतीसाठी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत.

स्थानिक वेळेनुसार सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली.

पोलिसांनी परिसराला घेराव घातला असून तपास सुरु केल्याचे पोलिसांनी सांगितले.

न्यूझीलंडच्या दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबारात 50 पेक्षा जास्त निष्पाप नागरीकांचा मृत्यू झाला होता. हा गोळीबार ऑस्ट्रेलियन दहशतवाद्याने केला होता.

हा गोळीबार करतानाचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जारी केला असून हल्लेखोर 37 वर्षाचा व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *