Wed. Oct 27th, 2021

नागपुर बाजारपेठेत गर्दीवर नियंत्रणासाठी आता ऑड-इव्हन फॉर्म्युला

नागपूर : विदर्भात कोरोनाबाधित नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. नागपूर शहरात संचारबंदी लावूनही नागरिकांची गर्दी ही बाजारपेठेमध्ये बघायला मिळत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागपुरात ऑड-इव्हन फॉर्म्युला अमलात आणण्याच्या सूचना मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी केला आहे.

यानुसार शहरातील 10 मनपा झोनपैकी पाच झोनमध्ये आदेश देऊन दुकाने खुली ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
शिवाय नागपूर शहरातील जुन्या बाजारपेठा आणि अरुंद रस्ते आजही तसेच असल्यानं गल्लीबोळातील दुकाने असणाऱ्या परिसरात होणारी गर्दी चिंतेची बाब ठरत आहे. विशेष म्हणजे यात काही सुपर स्प्रेडर असल्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. यामुळे उत्तर आणि पूर्व दिशेने उघडली जाणारी दुकाने सम तारखेला तर दक्षिण व पश्चिम दिशेतील दुकाने विषम तारखेला सुरू ठेवण्याचा ऑड-इव्हन फार्म्युला ठरवून देत याविषयीच्या सूचना मनपाकडून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय
धंतोली झोनमध्ये भाजीपाला दुकाने पहाटे 4 ते सकाळी 8 पर्यंत सुरू राहणार आहे तर कांदे व्यापारी यांचे दुकान सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत सुरू ठेवतील मात्र बाकी इतर दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहतील. तसेच आसिनगर, सतरंजीपुरा, मंगळवारी, धरमपेठ मध्ये ऑड-इव्हन तारखेप्रमाणे दुकाने सुरू राहणार आहे. महात्मा फुले भाजी मार्केटमधील ओटेधारक आणि दुकानदार यांच्यात विभाजन करून दुकाने सुरू व बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्यानं ऑड-इव्हन फार्म्युलाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *