Tue. Dec 7th, 2021

‘केंद्रात गो गो म्हणून बघा…’ NCP महिला पदाधिकाऱ्यांचा रामदास आठवलेंची टोला

कोरोना व्हायरस जगभरात थैमान घालत असताना मुंबईत मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या ‘गो कोरोना, कोरोना गो’च्या घोषणाबाजीने धमाल उडवून दिली. त्यांची घोषणा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर viral झाली. या घोषणेची नेटकऱ्यांनी टर्र देखील उडवली.

मात्र हा नारा लोकप्रियही झाला. त्यावर आपल्या या घोषणेमुळे महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव कमी झाल्याचं विधानही आठवले यांनी केलं. त्यानंतर त्यांच्या घोषणेची NCP च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी Tweet करून खिल्ली उडवली आहे.

‘केंद्रात गो गो असं म्हणून बघा, कधी तुमचा खो-खो करतील, हे तुम्हाला पण समजणार नाही’असं ट्विटकर रुपाली चाकणकर यांनी आठवले यांच्या घोषणेची टर्र उडवली आहे. ‘तुमच्या बोलण्याला महाराष्ट्रात तरी अर्थ नाही. केंद्रात गो गो म्हणून बघा. कधी तुम्हाला खो-खो करतील हे तुम्हालाही समजणार नाही. आठवले म्हणून पाठवले’ असं Tweet मध्ये चाकणकर यांनी म्हटलं आहे.

‘गो कोरोना, कोरोना गो’ प्रमाणे ‘महाविकास आघाडी गो’ असं म्हणावं लागणार असल्याचं रामदास आठवले म्हणाले होते. तसंच महाराष्ट्रात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असंही आठवले म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *