Tue. Oct 26th, 2021

चक्क महानगरपालिकेचं श्राद्ध!

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अंदाधुंद कारभाराविरोधात शिवसेना -भाजपा आर पी आय आगरी सेना महायुतीचा महा मोर्चा झोपेचे सोंग घेतलेल्या सत्ताधार्यांना जागे करण्यासाठी आज प्रचंड संख्येने त्रस्त जनसमूदाय मोर्चात सामील झाला होता, मोरच्या च्या वेळी वसई विरार महानगर पालिकेचे घातल श्राद्ध…

वसई- विरार शहर महानगरपालिकेच्या अनागोंदी आणि ढिसाळ कारभाराबाबत जाब विचारण्यासाठी शिवसेना – BJP- RPI- आगरी सेना श्रमजीवी संघटना- राष्ट्रीय समाज पक्ष- प्रहार संघटना ‘महायुती’ च्या माध्यमातून एकत्र आल्या. त्यांनी शुक्रवारी विरार येथील पालिका मुख्यालयावर ‘धडक मोर्चा’ काढला. यावेळी मुंडण करून ब्राम्हणांच्या उपस्थितीत महापालिकेचं प्रतिकात्मक श्राद्धच घालण्यात आलं. यावेळी पालघर लोकसभेचे खासदार यांनी ही महापालिका बरखास्त करावी यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार असल्याचं सांगितलं.

खासदार राजेंद्र गावीत,शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, उपजिल्हाप्रमूख निलेश तेंडुलकर, आगरी सेनेचे जिल्हाप्रमुख जनार्दन पाटील,तालुकाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर,तालुकाप्रमुख जितेंद्र शिंदे,भाजप जिल्हाप्रमुख सुभाष साटम,भाजपचे मनोज पाटील,आरपीआय जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे,प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव,प्रवीण म्हाप्रळकर,यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

वसई विरारमध्ये सलग दुसऱ्या वर्षीही निर्माण झालेली पुरपरिस्थिती, साथीचे रोग, रस्त्यांची झालेली चाळण, वाहतूक कोंडी आणि अनियमित पाणी तसंच विजपुरवठा यामुळे सर्वसामान्य नागरीक मेटाकुटीस आलेले आहेत.

वसई विरार महानगरपालिकेला जाणीव करुन देण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

सुमारे सात हजाराहून अधिक नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

पालिका मुख्यालयासमोर हा मोर्चा आल्यानंतर पालिकेच्या नावाने मुंडण करून ब्राह्मणांच्या उपस्थीतीत पालिकेचं विधीवत श्राद्ध घालण्यात आलं.

यावेळी पालघर लोकसभेचे आमदार यांनी वसई विरार महापालिका ही सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचणारी असून ही महापालिका बरखास्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडं घालणार असल्याचं सांगितलं.

त्यानंतर पालिका आयुक्त बळीराम पवार यांना मोर्च्यातील शिष्टमंडळाने मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी पालिका आयुक्त बळीराम पवार यांनी आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात आणि त्यांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *