Sun. Sep 19th, 2021

बॉलिवूड गायिका श्रेया घोषालने पोस्ट केला मुलाचा पहिला फोटो

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने २२ मे रोजी मुलाला जन्म दिला. त्यानंतर आता श्रेयाने आपल्या पती आणि मुलासह एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्याचं नावसुद्धा जाहीर केलं आहे. ‘देव्यान मुखोपाध्याय’ (Devyaan Mukhopadhyaya) असं श्रेयाच्या मुलाचं नाव आहे. फोटोत श्रेया आणि शिलादित्य यांच्यासोबत त्यांच्या चिमुकल्या मुलाची झलक पाहायला मिळतेय. ‘देव्यान मुखोपाध्यायची ओळख करून देतोय. २२ मे रोजी तो आमच्या आयुष्यात आला आणि आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं. देव्यानने माझं हृदय प्रेमाने भरून टाकलंय. एक आई आणि बाबाच या भावना खूप चांगल्याप्रकारे समजू शकतात. हे मला अजूनही स्वप्नवतच वाटतंय. आयुष्यातील या भेटीसाठी मी आणि शिलादित्य खूप कृतज्ञ आहोत’, असं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय. मार्च महिन्यात श्रेयाने फोटो पोस्ट करत घरी लवकरच पाळणा हलणार असल्याची गोड बातमी दिली होती. त्यानंतर तिच्या चाहत्यांकडून तिला शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. श्रेयाने २०१५ मध्ये प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्नगाठ बांधली होती. नवी दिल्लीत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता. श्रेयाने ‘सा रे ग म प’ या गायनस्पर्धेत श्रेयाने विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर श्रेयाने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. ‘देवदास’ या चित्रपटासाठी तिने पहिल्यांदा पार्श्वगायन केलं.राष्ट्रीय पुरस्कार व फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच श्रेयाने संगीताचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. श्रेयाने हिंदीसोबत इतर भाषांमधीलही अनेक गाणी गायली आहेत. काही रिअॅलिटी शोजमध्ये परीक्षक म्हणूनही झळकली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *