Fri. Sep 30th, 2022

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा वरपे यांच्याकडून करण्यात आला आहे. यावरुन वरपे यांनी शिंदे पितापुत्रांवर निशाणा साधला आहे. खा. श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?, असे रविकांत वरपे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांचे खुर्चीत बसले असतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. यावरुन अनेकजण राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत नसताना श्रीकांत शिंदे हे वर्षा बंगल्यावर आलेल्या नेत्यांचे आगतस्वागत करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे गणपतीच्या दर्शनासाठी वर्षा बंगल्यावर आले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर होते. तेव्हा श्रीकांत शिंदे यांनी पार्थ पवार यांचे स्वागत केले. यावेळी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर पार्थ पवार आणि श्रीकांत शिंदे यांनी काही काळ गप्पाही मारल्या होत्या.

 

काय म्हणाले श्रिकांत शिंदे

पण,राष्ट्रवादीचा आरोप  डॉ. श्रीकांत शिंदे यांनी धुडकवला आहे. राष्ट्रवादीने केलेला आरोप खोटा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीने ट्विट केलेला फोटो ठाण्यातल्या घरातला असल्याचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांचा माझ्या मागे दिसणारा फलक वेगळ्या जागी असल्याचं त्यांनी सांगितले आहे.  राष्ट्रवादीचे आरोप केवळ बदनामी करण्याच्या हेतूने हा खोटो फोटो ट्विट केल्याचं श्रिकांत शिंदे यांना सांगितलं आहे.

3 thoughts on “मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.