Fri. Jun 21st, 2019

छिंदमचं ‘डॅमेज कंट्रोल’… निवडून आल्यावर शिवचरणी लोटांगण!

0Shares

महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे भाजपचा श्रीपाद छिंदम चांगलाच अडचणीत सापडला होता. भाजपाने त्याच्यावर कारवाई करत छिंदमला पक्षातून हाकलून देत तडीपारही केलं होतं. पक्षातून बडतर्फ केल्यामुळे छिंदम ने महानगरपालिकेची निवडणूक अपक्ष लढवली आणि प्रचाराला उपस्थित न राहूनही छिंदम निवडून आला.

छिंदमने अहमदनगरच्या महानगर पालिकेसाठी प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवली होती,तडीपारीचा कालावधी संपल्यामुळे छिंदम पुन्हा आपल्या कार्यालयावर आला आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा जोतिबा फुले अशा महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालून अभिवादन केलं.

निवडणुकीत जिंकूनही तडीपार असल्यामुळे छिंदमला विजयाचा गुलाल उधळता आला नाही. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याने आपल्या कार्यालयात येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

याप्रसंगी बोलताना छिंदम म्हणाला

सर्व महापुरुषांच्या आशीर्वादानेच मला हा विजय मिळाला. निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता आले नाही. मात्र, जनतेने मला निवडून दिले. हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. कोणाताही सत्कार करून न घेता प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरूषांना अभिवादन करून नतमस्तक झालो.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: