Sun. May 16th, 2021

… कारण मीच बोलणारा देव आहे – सिद्धेश्वर महाराज

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा दिवसांवरच असताना भाजपाचे उमेदवार सिद्धेश्वर महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. १५ एप्रिलपासून १८ एप्रिलपर्यंत कोणीही देवदर्शनाला जाऊ नये कारण तुम्हाला देव भेटणार नाही असे म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जवळ आल्यामुळे राजकीय नेते आणि पक्ष सज्ज झाली आहेत. मात्र सिद्धेश्वर महाराज यांच्या अशा वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

नेमकं सिद्धेश्वर महाराज यांचं वक्तव्य काय ?

एप्रिलच्या १५ ते १८ तारखेपर्यंत कोणीही देवदर्शनाला जाऊ नये.

देवदर्शनाला गेलात तर तुम्हाला देव भेटणार नाही आणि भेटला तर बोलणार नाही असे सिद्धेश्वर महाराजांनी म्हटलं आहे.

तसेच तुम्हाला समाधान मिळणार नाही कारण बोलणारा देव मीच आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात सिद्धेश्वर महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मात्र त्यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे नागरिक नाराज झाले आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *