Jaimaharashtra news

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर सिद्धिविनायकाच्या दागिन्यांचा लिलाव

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक गणेश मंदिरात गणपतीच्या दागिन्यांचा आज लिलाव सुरू झाला.

 

साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेला अनेकजण सोन्याची खरेदी करतात. याचे औचित्य साधून गणपती बाप्पाला नवसाचे आणि दान म्हणून आलेल्या

दागिन्यांचा लिलाव करण्यात येतो.

 

या लिलावामध्ये बाप्पाच्या चरणी वाहिलेल्या विविध आकारातील सोन्याच्या अंगठ्या, प्रतिमा, लॉकेट, दुर्वा, सोन्याच्या साखळ्या, हार आदींचा समावेश आहे.

Exit mobile version