Tue. Aug 9th, 2022

भालाफेकीत नीरज चोप्राला रौप्य पदक

Mrunal Chavan 

भालाफेक क्रीडापटू नीरज चोप्राने जागतिक एथलॅटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. रविवारी सकाळी झालेल्या स्पर्धेत नीरज चोप्राने रोप्य पदकावर नाव कोरत नवा इतिहास रचला आहे. याआधी, नीरज चोप्राने टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटाकवले होते.

नीरज चोप्राने जागतिक एथलॅटिक्स स्पर्धेत ८८.१३ मीटर भालाफेक करत रोप्य पदक पटकावले आहे. नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नानंतर दुसऱ्या क्रमांकावर गवसणी केली आहे. तर, ग्रीनादच्या अँडरसन पीटर्सने ९०.५४ मीटर अंतरापर्यंत भाला फेकत सुवर्णपदक पटकावले आहे. अंजु बॉबी जॉर्जनंतर जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणारा नीरज चोप्रा हा दुसरा भारतीय क्रीडापटू आहे. तब्बल १९ वर्षानंतर जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारताला पदक मिळालं आहे. अंजु बॉबी जॉर्ज यांनी २००३ साली पॅरिस येथे लांब उडीत सुवर्णपदक विजेती कामगिरी केली होती.

जागतिक एथलॅटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राचा पहिली फेरी बाद ठरली. तर दुसऱ्या प्रयत्नामध्ये नीरजचा भाला ८२.३९ मीटरपर्यंत पोहचला. तिसऱ्या फेरीत नीरजने कमबॅक करत ८६.३७ मीटरपर्यंत भाला फेकला. तर चौथ्या फेरीत ८८.१३ मीटर अंतरावर भालाभेक करत रौप्य पदकावर नाव कोरले.

ग्रीनादच्या अँडरसन पीटर्सने जागतिक एथलॅटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुर्वणपदक पटकावले आहे. पहिल्या फेरीत अँडरसनने ९० मीटर अंतर पार केले. दुसऱ्या फेरीत अँडरसनने ९०. ४६ मीटर अंतर गाठलं. तर, अंतिम फेरीत ९०. ५४ मीटरवर भालाफेक करत सुवर्णपदकावर नाव कोरले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.