Thu. May 6th, 2021

सौरमालेतून काढून टाकण्यात आलेला एक अनोखा ग्रह

आपल्या सौरमालेत एकूण ८ ग्रह आहे. बुध, शुक्र, मंगळ, बृहस्पती, शनि, वरुण, अरुण आणि पृथ्वी अशी त्यांची नावं आहेत. मात्र यापूर्वी एक सौरमालेत ९ ग्रह असल्याचं म्हटलं जात होत. प्रत्येक ग्रहांचं स्वतःचं एक वेगळेपण आहे. आणि प्रत्येक ग्रह हे सुर्याची प्रदक्षिणा करत असतात. मात्र एक असा ही आहे जो सुर्याची प्रदक्षिणा करत असून त्याला 2006 नंतर प्लुटो ग्रहाचं नाव या सौरमालेतून काढून टाकण्यात आलं. या ग्रहाला आता वेगळ्या ग्रहांच्या सुचित टाकण्यात आलंय. यावर अनेक वैज्ञानिकांनी संशोधन केले यावर अनेक बैठका पण झाल्या मात्र या ग्रहाला वेगवेगळ्या सुचित टाकून त्याचा दर्जा काढण्यात आला. प्लुटो हा ग्रह सौरमंडळातील सर्वात बारिक ग्रह होता. आणि त्या सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला 248 वर्षे लागतात. पृथ्वीवरील एक दिवस या ठिकाणच्या 6.4 दिवसांइतका आहे. पृथ्वीवरील 24 तास म्हणजेच प्लुटोवरील 153 तासांइतके आहेत. हा ग्रह सूर्यापासून खूप दूर असल्यानं या ठिकाणी सूर्य प्रकाश पोहचायला 5 तासांचा वेळ लागतो. प्लुटो हा सूर्यमालेतील वस्तुमानाने दुसरा आणि आकाराने सर्वात मोठा बटुग्रह आहे. शिवाय हा ग्रह थंड असून
प्लुटोवरील तापमान खूप कमी आहे. त्यामुळेच तेथे जीवनाची शक्यता कमी आहे.

प्लुटोवरील तापमान उणे (मायनस) 233 डिग्री सेल्सिअस ते उणे 223 डिग्री इतकं तापमान आहे. या ग्रहावर मोठ्या प्रमाणात बर्फ आहे. येथे पाणी देखील आहे. येथील पाणी पृथ्वीवरील तिन्ही समुद्रांचं पाणी एकत्र केल्यास त्याच्या तिनपट आहे.
आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना (आय.ए.यू.)ने सर्वप्रथम ग्रहाची व्याख्या केली. या व्याख्येनुसार प्लूटोला ग्रहांच्या यादीतून वगळण्यात आले व त्याचे वर्गीकरण एरिस आणि सेरेससोबत बटुग्रह या नवीन वर्गात करण्यात आले. वर्गीकरणानंतर प्लूटोला लघुग्रहांच्या यादीत टाकण्यात आले व त्याला १३४३४० हा क्रमांक देण्यात आला. प्लूटोला ग्रह वर्गाच्या यादीत सामील कराव असं शास्त्रज्ञांच्या मतं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *