Sun. Jan 16th, 2022

भर पावसात जीव मुठीत घेऊन गावकरी करतायंत पुलावरुन ये जा

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

रस्ते हा प्रगतीचा पाया मानला जातो. मात्र, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रस्तेच नसल्याचं दिसून येत आहे.

 

सिंधुदुर्गातील दुकानवाड बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर कर्ली नदीच्यापलीकडे  वरचीवाडी गाव वसलेलं आहे. या गावात 250 लोकवस्ती आहे.

 

उन्हाळ्यात गावकऱ्यांना कर्ली नदी पार करून अर्धा किमी अंतर गाठून मुख्य रस्त्यावर यावं लागते. मात्र, पावसाळ्यात एकदा नदी दुधडी भरून वाहू लागली की

गावकऱ्यांना द्रविडी प्राणयाम करावा लागतो. त्यासाठी  ग्रामस्थांना लाकडी झुलत्या साकवावरून जीव मुठीत धरून ये जा करावी लागते.

 

यासंदर्भात अनेक लोक प्रतिनिधीनींनी निवडणूक काळात आश्वासनं दिली मात्र हे आश्वासन आश्वासनच राहीले. म्हणून गावकऱ्यांनी लोक वर्गणी काढून लोखंडी तारा,

वेली आणि जंगलातील मजबूत टणक लाकडाचा वापर करून झुलता साकव प्रत्येक वर्षी तयार करतात. जीव मुठीत घेऊन गावकऱ्यांना या पुलावरुन ये जा करावी

लागते.  मात्र अशी कसरत किती काळ करायची अशा प्रश्न गावकरी विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *