Fri. Dec 3rd, 2021

सेल्फीच्या नादात गमावला जीव; चार दिवसानंतर आंबोलीच्या दरीतून एक मृतदेह बाहेर काढण्यात यश

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

आंबोली कावळेसादच्या दरीत कोसळलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. दारुच्या नशेत स्टंटबाजी करताना दोन युवकांचा दरीत कोसळून मृत्यू झाला होता.

 

खूप खोल दरीत कोसळल्याने दोन्ही युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर बाबल अल्मेडांच्या स्थानिक बचाव पथकाला यातील एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

 

प्रताप राठोडचा मृतदेह अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आला. तर, इम्रान गारदीचा मृतदेह खूप खोलपर्यंत वाहून गेल्यानं तो बाहेर काढणं अशक्यच दिसत आहे.

 

या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी 4 पथकं दाखल झाली होती. पण दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर यातल्या काही सदस्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांनी माघार

घेतली होती. पण स्थानिक बाबल अल्मेडा यांनी मात्र प्रताप राठोडचा मृतदेह बाहेर काढून दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *