Jaimaharashtra news

सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतीच्या कॉम्प्युटरवर ‘रॅन्समवेअर’चा हल्ला ?

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

जगभरातील तंत्रज्ञान जगताला हादरवणाऱ्या रॅन्समवेअर व्हायरसने सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतीच्या संगणकावर हल्ला केल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे असं या ग्रामपंचायतीचं नाव आहे. मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीच्या संगणकातील डेटा पुन्हा देण्यासाठी 600 डॉलर म्हणजे सुमारे

42 हजार रुपयांची मागणी केली जाते.

 

या व्हायरसमुळे सुमारे 15 हजारहून अधिक प्रकारचे दाखले, ग्रामपंचायतींची कागदपत्र व्हायरसमुळे डिलीट झाली आहेत. ग्रामपंचायतीचा संगणक या व्हायरसमुळे पूर्णपणे

निकामी झाले.

या ग्रामपंचायतीत येणाऱ्या ग्रामस्थांचे हाल होत आहेत. जन्म-मृत्यूचे दाखले घरपत्रक उतारा तसेच विविध प्रकारचे दाखले व नोंदी व ग्रामपंचातीचे ग्रामसभेचे नोंदी अशा प्रकारचा सर्व डेटा या व्हयरसमुळे गेलाय… त्यामुळे ग्रामपंचायतीसमोर मोठे आव्हान उभे राहिलंय….

Exit mobile version