Jaimaharashtra news

भारताला सिंगापूरचा मदतीचा हात

देशात कोरोनाची दुसरी लाट असतानाच ऑक्सिजनच्या तुटवड्याचं आव्हान देशासमोर आहे. या ऑक्सिजन कमतरतेवर मात करण्यासाठी अनेक मित्रराष्ट्र मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. आता सिंगापूरदेखील भारताच्या मदतीसाठी पुढे आला आहे. सिंगापूरहून २५६ ऑक्सिजन सिलिंडर भारतात दाखल झाले आहेत. सिंगापूर एअर फोर्सच्या दोन विमानांनी हे ऑक्सिजन सिलिंडर भारतात आणण्यात आले आहेत.

सिंगापूरचे मंत्री मलिकी उस्मान यांनी सिंगापूर हवाई दलाच्या सी-130 ला हिरवा झेंडा दाखवत हे ऑक्सीजन सिलेंडर भारतात पाठवले. ज्यामध्ये 256 ऑक्सीजन सिलेंडरचा समावेश आहे.भारतीय हवाई दलाच्या मालवाहू सी- 17 विमानाने दुबईहून क्रायोजेनिक ऑक्सिजन सिलिंडर कंटेनर भारतात आणले आहेत.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Exit mobile version