Fri. May 20th, 2022

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांनी बस्तान ठोकले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप तातपुरता मागे घेत असल्याची घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली. मात्र तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असलेले भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून माघार घेण्याची घोषणा केली आहे, यावर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वेतनवाढीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारमधील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सरकारमधल्या नेत्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीकेची झोड सदावर्ते यांनी सोडली.

वकिल गुणरत्न सदावर्ते म्हणाले, सरकारने घाणेरडे राजकारण केले आहे. आमची वेतनवाढीची मागणी नसून विलिनीकरणाची मागणी आहे. विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. काही दिवस कामगारांच्या भावना म्हणून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. या दरम्यान ४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली तरिही शरद पवार गप्प बसले. एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्वासाचे खून करण्याचे काम शरद पवार यांनी केले. शरद पवार कालच्या परिक्षेत नापास झाले आहेत. वेळेत पगार न देणारे सरकार किती खोटं बोलू शकते हे दिसून आले आहे. न्यायालयाने विलिनीकरणाचा निर्णय घेऊ नका असे न्यायालयाने म्हटले नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच शरद पवार, अजित पवार, अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी राजकारण केले आहे. आणि त्यात ते नापास झाल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.