मुंबईमध्ये गाडीने प्रवास करत असाल तर, हि बातमी वाचाच

मुंबईकरांना आठवड्यातून चार दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. मुंबईतील शीव उड्डाणपूल आठवड्यातून चार दिवस बंद राहणार आहे.
पुलाच्या सांध्यांमध्ये पोकळी निर्माण झाल्याने बेअरिंग बदलण्याचे महत्त्वाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. शुक्रवारी पहाटे पाच वाजल्यापासून सोमवारी पहाटे 5 वाजे पर्यंत पूल बंद राहणार आहे. असे महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांना स्पष्ट केले आहे.
यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होणार आहे. एकंदरीत 8 ब्लॉक मध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच पुढील आठ आठवड्यातील प्रत्येक चार दिवस हा उड्डाणपूल बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
मुंबईतील शीव उड्डाणपूल बंद असल्याने मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पुलाखाली वाहतूक कोंडी झाल्याने चाकरमनी अडकून पडले आहेत. बऱ्याच मुंबईकरांना पूल का बंद आहे हेच माहीत नसल्याने त्यांच्या त्रासात अजून भर पडत आहे. एकंदरीतच याचा वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परीणाम पडल्याचे चित्र दिसत आहे.