Mon. Sep 20th, 2021

म्हणून ‘ती’ मिसळत होती दिराच्या जेवणात स्वत:चं रक्त…

आपल्या दिराने आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून वहिनीने अघोरी उपाय केल्याची धक्कादायक घटना डेहराडून येथे उघडकीस आली आहे. संबंधित विवाहिता आपल्या दिरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र आपला दीर आपल्याला कधीही सोडून निघून जाईल अशी भीती तिला सतावत होती. त्यामुळेच दिराला काबूत करण्यासाठी त्याच्या जेवणात स्वत:चं रक्त मिसळत होती.

काय घडलं होतं नक्की दोघांमध्ये?

चार महिन्यांपासून वहिनी (रीता) आणि दीर (अर्जुन) लिव्ह इन मध्ये राहत होते.

मात्र दीर आपल्याला सोडून दुसऱ्या कुणासोबत निघून जाईल, अशी तिला सतत भीती वाटत होती.

म्हणून दिराला आपल्या काबूत ठेवण्यासाठी तिने अघोरी उपाय अवलंबायला सुरुवात केली.

एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून ती चक्क आपल्या दिराच्या जेवणात रोज स्वत:चं रक्त टाकून मिसळत होती.

मात्र एक दिवस ही भयानक गोष्ट दिराच्या लक्षात आली.

22 जून रोजी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं.

दिराने अर्थातच तिच्यापासून सोडण्याचा निर्णय घेतला.

त्याच्या निर्णयाने वहिनी घाबरून गेली. दिराने वहिनीला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकण्यास तयार नव्हती.

जादूटोण्याच्या प्रकारामुळे दीर मुळातच संतापला होता. त्यातून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं.

संतापाच्या भरात दिराने तिच्या डोक्यात दगड घातला.

ती रक्तबंबाळ झाली आणि खाली कोसळली. हे बघून अर्जुन घाबरला.

तिचा मुत्यू झाला असावा असं समजून त्याने दरवाजाला बाहेरून कडी लावली, आणि तिथून पळ काढला.

शेजारच्यांना संशय आल्यामुळे त्यांनी जेव्हा रिताच्या घरी प्रवेश केला, तेव्हा घरातील दृश्य बघून ते हादरले.

रिता गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर पडली होती. शेजाऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवलं.

पोलिसांनी रीताला लगेच रुग्णालयात दाखल केलं. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.  अर्जुन फरार असल्याने पोलिसांनी घराची झडती घेतली. तेव्हा सिमकार्ड नसलेला एक मोबाईल पोलिसांना सापडला. त्याच्यावर IMI नंबर असल्याने त्यावरून पोलिसांनी अर्जुनचा माग काढला आणि त्याला देहरादूनहून त्याला अटक केली. पोलीस आता पुढील चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *