Thu. Jan 27th, 2022

नांदिवली भागातील बाधित नागरिकांचं ठिय्या आंदोलन

डोंबिवली : डोंबिवलीतील नांदीवली मठाजवळील परिसरात पाणी साचण्याचा फटका येथील नागरिकांना सहा वर्षापासून बसतो आहे. येथील रस्ते, इमारती आणि दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. श्री समर्थ धाम सोसायटीत अशाच प्रकारे तळ मजला पाण्याखाली जातो. त्यामुळे येथील दुकानात ६ फुटापर्यंत पाणी साचले होते. यामुळे दुकानातील वस्तूंचं नुकसान होऊन आता बरेच दिवस झाले मात्र अद्याप कोणी शासकीय प्रशासकीय अधिकारी तेथे फिरकला नाही आहे. इमारतीच्या मागच्या बाजूस जो नाला होता तो बुजवण्यात आल्यान पाण्याच्या दबावामुळे येथील संरक्षण भिंत तुटली आहे. पाणी साचले की लाइटही जाते त्यामुळे रहिवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जाव लागत आहे. पत्र देऊन सुद्धा महापालिका काम करत नसल्याने नांदिवली भागातील बाधित नागरिकांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *