Mon. Jan 17th, 2022

‘बसपा’मधील सहा आमदारांचा समाजवादी पक्षात प्रवेश

  उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्ष(बसपा)ला मोठा झटका बसला आहे. बहुजन समाज पक्षातील सहा आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. अखिलेश यादव  यांनी सहा आमदारांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे.

  बहुजन समाज पक्षाच्या अस्लम राइनी, अस्लम अली चौधरी, मुज्तबा चौधरी, हाकिम लाल बिंद, हरगोविंद भार्गव, सुष्मा पटेल या सहा आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. तसेच भाजपचे सीतापूरमधील आमदार राकेश राठोड यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष हा भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून लढणार आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुक तोंडावर असतानाच ‘बसपा’मधील सहा आमदारांनी समाजावादी पक्षात प्रवेश केल्यामुळे बहुजन समाज पक्षाला झटका बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *