राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळणाऱ्या सहा जणांवर गुन्हा

कोल्हापूर : राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळणाऱ्या अभाविपच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहपुरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय बेकायदेशीर रित्या जमाव जमवल्याने गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अभाविपकडून राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं काँग्रेस जिल्हा आणि शहर कमिटी कार्यालयाच्या बाहेर दहन करण्यात आलं.
सावरकरांच्या विरोधातील वक्तव्याच्या निषेध म्हणून राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता.
दरम्यान या जळत्या प्रतिकात्मक पुतळ्याला लाथ मारताना अभाविप कार्यकर्त्याच्या पॅन्टला आग लागली होती. विशाल शिराळकर असे या कार्यकर्त्यांच नाव आहे.