‘या’ कंपनीतर्फे 9 तास झोपण्याची नोकरी, 1 लाख रुपये पगार!

तुम्हाला झोपायला आवडतं का? जर तुम्हाला झोपण्याचेही पैसे मिळणार असतील तर? अशा प्रकारचीही एखादी नोकरी असू शकते का? पण अशी एक कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये तुम्हाला चक्क झोपण्याचे पैसे मिळतात. ते ही थोडे थोडके नव्हे, तर चक्क लाखो रुपये.
या झोपेच्या कामासाठी नुकत्याच 23 जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. बेंगळुरू येथील वेकलिफ्ट (Wakelift) या स्टार्टअपने कंपनीतर्फे 23 जणांना इंटर्नशिप देऊ केली आहे.
काय आहे त्यांची नोकरी?
या इंटर्न्सना 100 रात्री 9 तास झोपण्याची नोकरी देण्यात आली आहे.
या इंटर्न्सना 1 लाख रुपये पगार मिळणार आहे.
यासाठी 21 भारतीय आणि 2 विदेशी इंटर्न्सची निवड करण्यात आली.
या इंटर्न्सना रोज कंपनीने दिलेल्या गाद्यांवर 9 तास गाढ झोपी जायचं आहे.
त्यासाठी स्लीप ट्रॅकरदेखील लावण्यात येणार आहे, आणि किती चांगली झोप लागली आहे, हे तपासले जाणार आहे.
याशिवाय तज्ज्ञांसोबत कौन्सिलिंगही होणार आहे.
घरातच या इंटर्न्सला गादी देण्यात येणार आहे. तसंच स्लीप ट्रॅकरही पुरवण्यात येणार आहेत.
आठवडाभर इंटर्न्सना घरातच दिवसभर झोपायचं आहे.
या सर्वांना युनिफॉर्मही देण्यात आला आहे. हा युनिफॉर्ममध्ये ‘पायजमा’घालून झोपणं इंटर्न्सना बंधनकारक आहे.
कशी झाली निवड?
झोपण्याच्या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना कंपनीला एक व्हिडिओ पाठवण्यास सांगितलं होतं.
या व्हिडिओमध्ये आपल्याला झोपायला का आवडतं, ते स्पष्ट करायला सांगितलं होतं.
यातील ज्यांची उत्तरं आवडली, त्यांना कंपनीने आमंत्रित केलं.
या उमेदवारांना शांतपणे झोपण्यास सांगितलं. जे उमेदवार आरामात गाढ झोपून गेले, त्यातील 21 जणांची निवड करण्यात आली.
LinkedIn वरून या नोकरीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. लाखो अर्जांमधून 23 जण निवडले गेले.
हा उपद्व्याप कशासाठी?
वेकफिट इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड लोकांच्या झोपण्याच्या पॅटर्नवर रिसर्च करत आहे. लोकांना शांत झोप लागण्यासाठी काय आवश्यक आहे, याचा अभ्यास या स्टार्टअपतर्फे करण्यात येत आहे. त्यासाठीच त्यांनी ही स्लीप इंटर्नशिप देऊ केली आहे.