Jaimaharashtra news

Surgicalstrike2 : ‘निवांंत झोपा कारण … ‘ पाकिस्तानी हवाई दलाचे ट्विट ट्रोल

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून ‘ जैश’च्या तळांवर १००० किलो वजनाचे बॉम्ब फेकून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय हवाई दलाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती मिळाली आहे. १२ मिराज २००० विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसूनही हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यापूर्वीच पाकिस्तान डिफेन्स या ट्विटर अकाऊंटवरून ‘निवांत झोपा कारण पीएएफ जागे आहे’ असे ट्विट केले आहे. हवाई दलाच्या हल्ल्याच्या काही तासापूर्वीच हे ट्विट केल्यामुळे सोशल मीडियावर चांगलच ट्रोल होत आहे. हे अकाऊंट अधिकृत नसले तरीही या ट्विटमुळे चांगलच ट्रोल होत आहे.

नेमकं ट्विट काय ?

पाकिस्तान डिफेन्स या ट्विटर अकाऊंटवरून रात्री १२ वाजून ६ मिनिटाने निवांत झोपा, पीएएफ जागे आहे, असे ट्विट केले.

हे अकाऊंट अधिकृत नसले तरी पाकिस्तान ट्रोल होत आहे.

तसेच देशभरात या हल्ल्यामुळे जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ गेले नसल्याचेही काहीनी म्हटलं आहे.

 

Exit mobile version