Tue. May 17th, 2022

बोरघाट पुलावर वाहतुक धिम्यागतीने

विकेंड आला की सर्व सामान्य नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडतात. आज दुसरा शनिवार असल्याने सलग सुट्ट्यांमुळे फिरायला जाणाऱ्याचं प्रमाणात वाढ झाली आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून फिरण्यासाठी साऱ्या महाराष्ट्रातून लोक पर्यटनासाठी बाहेर पडतात. त्यामुळे बोरघाटात अमृतांजन पूलावर दोन्ही बाजूला दोन ते तीन किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

तेथील वाहतूक अत्यंत धिम्या गतीन सुरू आहे. खंडाळा लोणावळा दिशेने आणि मुंबई दिशेने जाणाऱ्या मार्गावर 2 ते 3 किमी पर्यंत धिम्या गतीने वाहतूक सुरू आहे. वाहतूक गोंडी झाल्याने पोलीसांचं काम देखील जास्त वाढलं आहे. वागतूक कोंडी सोडवताना पोलासांची दमछाक झाली पहायला मिळत आहे. सलग सुट्ट्या आणि वीकेंडमुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेत कडक ऊन आणि वागतूक कोंडी यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, मुंबई पुणे एक्सप्रेस रस्त्यावर खालापूर टोलनाका आणि बोरघाटात वाहतुक कोंडी झाली आहे. विकेंड तसेच अवजड वाहनं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे छोट्या वाहन चालकांना वाहतूक कोडींचा त्रास सहन करावा लागत आहे. फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांचा वाहतुक कोंडीमध्ये जास्त वेळ जात आहे. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.